उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हस्ते महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्राप्त डॉ.सुषमा जाधव-गुळूमकर यांचा सन्मान
एक शिक्षक म्हणून देखील त्यांचे शैक्षणिक कार्य देखील आदर्शवत असेच आहे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हस्ते महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्राप्त डॉ.सुषमा जाधव-गुळूमकर यांचा सन्मान
एक शिक्षक म्हणून देखील त्यांचे शैक्षणिक कार्य देखील आदर्शवत असेच आहे
बारामती वार्तापत्र
ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न” राष्ट्रीय पुरस्कार-२०२५ यांच्या अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा.डॉ.सुषमा जाधव -गुळूमकर यांना प्रधान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराबद्दल समाजातून त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रा.डॉ. गुळूमकर यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती अनेक समाज उपयोगी व लोकोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत तसेच त्यांचे कार्य पुढे अविरतपणे चालू आहे.
तसेच एक शिक्षक म्हणून देखील त्यांचे शैक्षणिक कार्य देखील आदर्शवत असेच आहे. त्यांच्या हातून अनेक सुसंस्कारित होतकरू विद्यार्थी घडले आहेत.
ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न” राष्ट्रीय पुरस्कार-२०२५ यांच्या अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सहयोग बारामती या ठिकाणी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोच पावती असल्याचे मनोगत व्यक्त करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरस्कार, सन्मान चिन्ह आणि मेडल स्वतःच्या हस्ते त्यांना प्रदान करून त्यांचा सन्मान केला व कौतुकाची थाप मारली.
या सन्मानामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याची भावना प्रा.डॉ.सुषमा गुळूमकर यांनी व्यक्त केली.
ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले.
यावेळी बारामती तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष विद्याराणी चव्हाण,बारामती तालुका जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष शारदा मदने, बारामती तालुका जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष शीलाराणी रंधवे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गुळूमकर आदी उपस्थित होते.






