
डॉ. क्रांती वाबळे सपकळ यांना पीएच.डी. पदवी प्रदान
डॉ. अविनाश कदम यांनी प्रभावी मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या* संगणक शास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका व माजी विद्यार्थिनी डॉ. क्रांती वाबळे यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आज अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची संगणक शास्त्र विषयाची विद्यावाचस्पती (PhD) ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाली आहे.
डॉ. वाबळे यांनी संगणकशास्त्र विषयात
“ डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क फॉर एनालिसिस युजिंग आय ओ टी फॉर फार्मिंग इन पुणे रिजन” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी चिखली येथील मार्गदर्शक डॉ. अविनाश कदम यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
हे संशोधन कार्य शेती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे.
पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त सौ सुनेत्रा वहिनी पवार, उपाध्यक्ष श्री अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, संगणक विभाग प्रमुख डॉ गजानन जोशी पदव्युत्तर समन्वयक डॉ. जगदीश सांगवीकर, प्रा. किशोर ढाणे, डॉ. गौतम कुदळे, प्रा महेश पवार*, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी *डॉ. क्रांती वाबळे* यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार आणि विद्यार्थ्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
डॉ. क्रांती वाबळे यांच्या या उल्लेखनीय संशोधनामुळे संगणकशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात नव्या दृष्टिकोनाची भर पडली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी त्यांना सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.






