इंदापूरच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये लातूर, तर मुलींमध्ये कोल्हापूर विभाग ठरले विजेते!
मुलांच्या गटात लातूर विभागाने अंतिम सामन्यात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला

इंदापूरच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये लातूर, तर मुलींमध्ये कोल्हापूर विभाग ठरले विजेते!
मुलांच्या गटात लातूर विभागाने अंतिम सामन्यात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला
इंदापूर;प्रतिनिधि
महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने, तसेच इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान व पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या सहकार्याने आयोजित १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मुलांच्या गटात लातूर विभागाने, तर मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
म्हसोबाची वाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे ‘पवार स्पोर्ट्स अकॅडमी’च्या वतीने या स्पर्धेचे नेटके आयोजन करण्यात आले होते.मुलांच्या गटात लातूर तर मुलींमध्ये कोल्हापूर अव्वलया राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागांच्या संघांनी आपला कस लावला.
मुलांच्या गटात लातूर विभागाने अंतिम सामन्यात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई विभागाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर अमरावती विभागाने तृतीय क्रमांक मिळवला.दुसरीकडे, मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाच्या खेळाडूंनी मैदानावर वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला. या गटात लातूर विभाग द्वितीय, तर मुंबई विभाग तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणस्पर्धेचा सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण सोहळा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप, उपाध्यक्ष संजय देशमुख, पुणे विभाग सचिव विलास घोगरे, कोल्हापूर विभाग सचिव प्रीतम खोत, छत्रपती संभाजीनगर विभाग सचिव सतीश पाठक आणि अमरावती विभाग सचिव अतुल नेवारे प्रामुख्याने उपस्थित होते.
याशिवाय, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य करणारे म्हसोबाची वाडी येथील स्थानिक मान्यवर माधवी सूर्यवंशी, सुप्रिया खडसे, अरविंद चांदगुडे, पंकज चांदवडे, अनिकेत झेंडे आणि Adv. शहानुर शेख यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना आणि संघांना करंडक व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्याला वाव देणाऱ्या या स्पर्धेचे क्रीडाप्रेमींकडून मोठे कौतुक होत आहे.






