इंदापूर
इंदापूरात भर दिवसा नगरसेवक अनिल पवार यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
चॉपर आणि चाकूने हल्ला

इंदापूरात भर दिवसा नगरसेवक अनिल पवार यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
चॉपर आणि चाकूने हल्ला
बारामती वार्तापत्र
इंदापूरात नगरसेवकावर जीवघेणे हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते ( नगरसेवक ) अनिलअण्णा पवार यांच्यावर आज नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.
नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्या मागील नेमके कारण काय याचा पोलीस तपास सुरू आहे…..






