क्राईम रिपोर्ट

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३.५७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

गुटखा साठवून ठेवल्याची कबुली

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३.५७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

गुटखा साठवून ठेवल्याची कबुली

बारामती वार्तापत्र

पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा विक्री, वाहतूक व साठवणुकीविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत माळेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ लाख ५७ हजार ३२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी रामदास बाबू मोरे (रा. मोरेवाडी, मेढद, ता. बारामती) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत मेढद येथे प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुटखा साठवून ठेवल्याची कबुली दिली.

यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष मेढद येथील मोरेवाडी परिसरातील घराची झडती घेण्यात आली. या कारवाईत ३,५७,३२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपीने हा माल गौरव जोगदंड (रा. तांदुळवाडी, बारामती) व गणेश मदने (रा. बारामती) यांच्याकडून मिळाल्याची माहिती दिली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने संबंधितांविरुद्ध स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४/२०२६ अन्वये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, भैरवनाथ बोराटे, सागर शिंदे, जयसिंग कचरे, अमोल कोकेरे, अमोल वाघमारे, फिरोज कांबळे आणि सागर पवार यांच्या पथकाने केली.

Back to top button