स्थानिक

बारामतीतील गुणवडी रोड परिसरात नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष?बेकायदेशीर पूल हटवला; दोन महिन्यांपासून रस्त्यावरील लाईट बंद, नागरिक त्रस्त

परिसरात अंधार असल्याने चोरी, अपघात तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे.

बारामतीतील गुणवडी रोड परिसरात नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष?बेकायदेशीर पूल हटवला; दोन महिन्यांपासून रस्त्यावरील लाईट बंद, नागरिक त्रस्त

परिसरात अंधार असल्याने चोरी, अपघात तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील गुणवडी रोड परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात कोणतीही अधिकृत परवानगी अथवा नगरपालिकेकडे अर्ज नसताना खालील पातळीवर बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आलेला पूल काही दिवसांपूर्वी हटवण्यात आला.

मात्र, पूल हटवल्यानंतर तेथील रस्त्यावरील विद्युत व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून गेले तब्बल दोन महिने या भागातील लाईट बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूल हटवताना संबंधित यंत्रणांनी विद्युत तारा व खांबांच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. परिणामी संपूर्ण परिसर अंधारात गेला असून रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रात्री ये-जा करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तसेच विद्युत विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. “दरवेळी फक्त आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात काम काहीच होत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

परिसरात अंधार असल्याने चोरी, अपघात तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यावरील विद्युत व्यवस्था सुरळीत करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करावी, तसेच ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केला आहे अशा अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button