स्मार्ट मीटरला विरोध अनिल पवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर बंद
दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम

स्मार्ट मीटरला विरोध
अनिल पवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर बंद
दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम
इंदापूर.; प्रतिनिधित्व
स्मार्ट मीटर योजनेला विरोध आणि दोन दिवसांपूर्वी इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी इंदापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि विविध घटकांनी प्रतिसाद दिल्याने प्रमुख बाजारपेठा दिवसभर बंद राहिल्या.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.
स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीसह विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. बंद दरम्यान शहरात शांततेचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला.
दरम्यान, या बंदमुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर तसेच अनिल पवार यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.






