आपला जिल्हा

अजित पवार विमान दुर्घटनेचं गूढ कायम; चार महिन्यांनंतर युगेंद्र पवारांचा थेट सवाल

दुर्घटनेमागील सत्य बाहेर यावं यासाठी सगळेच आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत.

अजित पवार विमान दुर्घटनेचं गूढ कायम; चार महिन्यांनंतर युगेंद्र पवारांचा थेट सवाल

दुर्घटनेमागील सत्य बाहेर यावं यासाठी सगळेच आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत.

बारामती वार्तापत्र

दिवंगत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीतील स्मृतीस्थळी जाऊन अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.

“गोजुबावी हा जिरायत भाग आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलात तर तिथे एकही मोठं झाड दिसणार नाही. त्यामुळे अहवालात जे काही मुद्दे मांडले गेले, ते न पटण्यासारखे आहेत,” असं युगेंद्र पवार म्हणाले.
या दुर्घटनेमागील सत्य बाहेर यावं यासाठी सगळेच आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. जय सुद्धा सीआयडीच्या संपर्कात आहे. पार्थ दादांचीही इच्छा आहे आणि वहिनींचीही इच्छा आहे. आमची तर भूमिका स्पष्ट आहेच, रोहित दादाही या विषयावर आवाज उठवत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी अनेक यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. “सीबीआय चौकशी करत आहे. सीआयडी, डीजीसीए, एएआयबी अशा विविध संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे, लवकरात लवकर आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

Back to top button