क्राईम रिपोर्ट

जिल्ह्यात ‘गर्भलिंगनिदान रॅकेट’ तोतया डॉक्टरच्या सॅकमध्ये सोनोग्राफी मशिन; विविध ठिकाणचे १५ डॉक्टर रडारवर; दोघे फरारी

तांत्रिक तपासातून १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्काचे धागेदोरे हाती लागले आहेत.

जिल्ह्यात ‘गर्भलिंगनिदान रॅकेट’ तोतया डॉक्टरच्या सॅकमध्ये सोनोग्राफी मशिन; विविध ठिकाणचे १५ डॉक्टर रडारवर; दोघे फरारी

तांत्रिक तपासातून १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्काचे धागेदोरे हाती लागले आहेत.

बारामती वार्तापत्र 

यवत परिसरात उघडकीस आलेल्या गर्भलिंगनिदान प्रकरणाचे धागेदोरे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. बिबवेवाडी आणि चिंचवड येथील काही डॉक्टरांकडून गर्भलिंगनिदानासाठी रुग्ण पाठविले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, सध्या सुमारे १५ डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. किकवी (भोर) आणि उरुळी कांचन येथील दोन डॉक्टरांचा यातील सहभाग आहे. त्यांना आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, हे दोन्ही डॉक्टर फरारी झाले आहेत.

या प्रकरणी गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या विविध कलमानुसार यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांनी गिरीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले; तसेच त्याच्या कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडीआर) तपासणी केली आहे. या तपासातून त्याच्या सातत्याने संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त झाली आहे. उरुळी कांचन, इंदापूर, लोणीकंद आणि किकवी (ता. भोर) यांसह फलटण, अहिल्यानगर परिसरातही हे रॅकेट सक्रिय होते अशी असल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. किकवी येथील डॉ. दत्तात्रय भामळे व उरुळी कांचन येथील डॉ. संतुराम कदम यांनाही यवतच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यांना कारवाईची चाहूल लागताच ते फरारी झाले आहेत.
———-
पुण्यातील नामांकित डॉक्टरचे आरोपीला दीडशे कॉल
तपासात एक डॉक्टर आणि गिरी यांच्यात वारंवार संपर्क झाल्याचे आढळून आले आहे. संबंधित डॉक्टरला याबाबत विचारणा करण्यात आली असता, जमिनीच्या व्यवहारासंदर्भात संपर्क झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरू आहे. तपासादरम्यान एका डॉक्टरकडून गिरीला तब्बल दीडशेहून अधिक कॉल करण्यात केले आहे, त्या अनुषंगाने पोलिस अधिक तपास सुरू आहे.


————-

Back to top button