राजकीय

किशोर मासाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन सादर, राजीनाम्याची मागणी

राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला धक्का पोहोचविणाऱ्या वक्तव्यांचा निषेध

किशोर मासाळ यांच्या वक्तव्याचा निषेध
नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन सादर, राजीनाम्याची मागणी

राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला धक्का पोहोचविणाऱ्या वक्तव्यांचा निषेध

बारामती वार्तापत्र 

बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्याविषयी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सहयोगी पक्षांच्या नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या संदर्भात नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वी सर्व नगरसेवकांनी ‘सहयोगी’ या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील ओएसडी सचिन यादव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, उपगटनेते संपदा चौधर, प्रतोद विशाल हिंगणे, सभापती अमर धुमाळ यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी या निवेदनावर सह्या करून पाठिंबा दर्शविला.

निवेदनात अजित पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य बारामतीकरांच्या भावना दुखावणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अपमानास्पद वक्तव्यांना जनतेचा पाठिंबा मिळणार नसून संबंधित नगरसेवकाविरोधात पक्ष आणि प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित नगरसेवकांनी एकमुखाने निषेध व्यक्त करत अजित पवार यांच्याविषयीचा आदर आणि निष्ठा कायम असल्याची भावना व्यक्त केली.

तसेच बारामतीच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला धक्का पोहोचविणाऱ्या वक्तव्यांचा निषेध करत संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली.

Back to top button