मेडिकल कॉलेजला उपमुख्यमंत्र्यांची अचानक भेट सुनेत्रा पवार यांनी दादा स्टाईल अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
काही कर्मचारी रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मेडिकल कॉलेजला उपमुख्यमंत्र्यांची अचानक भेट सुनेत्रा पवार यांनी दादा स्टाईल अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
काही कर्मचारी रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बारामती वार्तापत्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज मधील रुग्णालयाबाबत अनेक रुग्णांकडून आरोग्य सुविधांबाबत तक्रारी आल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी कोणतीही पूर्वसूचना न देता बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालय येथे अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.
या भेटीदरम्यान रुग्णालयातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बारामती येथील शासकीय कॉलेज मधील रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत सुनेत्रा पवार यांनी स्वच्छता, औषधांचा पुरवठा, उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही कर्मचारी रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना फटकारले आणि रुग्णसेवेत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला.
———–
निष्काळजीपणा केल्यास कारवाई
रुग्णाना उपचारांदरम्यान येणाऱ्या अडचणी, सुविधा आणि तक्रारी जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली. “फक्त मोबाईलमध्ये बघता काय, कर्मचाऱ्यांची नावे लिहून घ्या,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
———
अजित पवार यांच्या कार्यशैलीची आठवण
हॉस्पिटलच्या कामकाजाबाबत सुनेत्रा पवार यांनी पूर्वसूचना न देता दवाखाने, शासकीय कार्यालये आणि विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याची त्यांची दादांच्या शैली परिचित झाली. बारामतीतील रुग्णालय भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या कामकाजात त्याच कार्यपद्धतीची झलक पाहायला मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
———–






