कृषी

कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कार्यशाळा संपन्न

आरोग्य पर्यवेक्षक सुप्रिया सावरकर यांनी नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षणाबाबत माहिती दिली

कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कार्यशाळा संपन्न

आरोग्य पर्यवेक्षक सुप्रिया सावरकर यांनी नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षणाबाबत माहिती दिली

बारामती वार्तापत्र 

आरोग्य विभागाच्यावतीने पावसाळ्यातील उद्भवणारे कीटकजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या हिवताप उपपथक कार्यालय, प्रशासकीय भवन येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले, पावसाळ्यात डेंग्यू, चिकणगुनिया अशा कीटकजन्य आजारावंर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यावर्षीही किटकशास्त्रीय सर्वेक्षण करुन घ्यावे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना संशयित रुग्णाचे रक्तजल नमुना वेळेत तपासणी करण्यासोबत कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवावे.

आपल्या भागातील ग्रामपंचायत पदाधिकारी व परिसरातील शाळेत देखील जनजागृती करावी. जुलै महिन्यात पालखी सोहळा असल्याने आतापासूनच परिसरातील विहीर, हातपंप शुद्धीकरण करण्याची मोहिम हाती घ्यावी, असे डॉ. खोमणे यांनी सूचना दिल्या.

आरोग्य पर्यवेक्षक सुप्रिया सावरकर यांनी नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. तसेच संदिप बालगुडे व गणेश घोरपडे यांनी डेंग्युरुग्णांचा शोध व गप्पी मासे तसेच हिम्मत कौले व गणेश जाधव यांनी ‘हसत खेळत डेंग्यूवर पाळत’ आणि बी. एस. एस. उपाध्ये यांनी आयुर्वेदिक वनस्पतीव्दारे डास नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.

Back to top button