आपला जिल्हा

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूसासह दोघे जेरबंद

7.65 एमएमचे जिवंत काडतूस, धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन जप्त

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूसासह दोघे जेरबंद

7.65 एमएमचे जिवंत काडतूस, धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन जप्त

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार हत्यारासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कऱ्हावागज परिसरात एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती माळेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून एक गावठी पिस्तूल, 7.65 एमएमचे जिवंत काडतूस, धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.

या कारवाईत सुमारे ३ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश तात्याराम गावडे आणि मयूर विष्णू मोरे यांचा समावेश आहे.

दोघांविरोधात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने बाळगली होती आणि ती कुठून आणली याचा अधिक तपास माळेगाव पोलीस करत आहेत.

Back to top button