बारामतीतील स्वयम्भू हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; सर्व रुग्ण सुरक्षित
अग्निशमन दलाने धुराचे निर्गमन (व्हेंटिलेशन) करून परिस्थिती नियंत्रणात आणली

बारामतीतील स्वयम्भू हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; सर्व रुग्ण सुरक्षित
अग्निशमन दलाने धुराचे निर्गमन (व्हेंटिलेशन) करून परिस्थिती नियंत्रणात आणली
बारामती वार्तापत्र
बारामतीतील स्वयम्भू हॉस्पिटल येथे पहाटे 03:58 वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला असल्याचे आढळून आले. धुरामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अग्निशमन दलाने धुराचे निर्गमन (व्हेंटिलेशन) करून परिस्थिती नियंत्रणात आणली व संपूर्ण परिसर सुरक्षित केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बचाव आणि नियंत्रण कार्यात वाहन चालक मिरगुंडे, प्र. सहाय्यक अग्निशमन अधिकारी निखिल कागडा यांच्यासह बारामती एमआयडीसी अग्निशमन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.






