
बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सचिन वाघ बिनविरोध
संघटनेच्या कामकाजाला अधिक गती
बारामती वार्तापत्र
बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सचिन वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या विरोधी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ॲड. वाघ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान अध्यक्षपदासाठी काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सर्व विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ॲड. सचिन वाघ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
ॲड. वाघ यांच्या निवडीचे बारामती वकील संघटनेतील सदस्यांनी स्वागत केले असून, त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, तसेच वकिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
——
बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सचिन वाघ बिनविरोध
विरोधकांनी घेतली माघार; ॲड. सचिन वाघ यांची अध्यक्षपदी निर्विरोध निवड.
बारामती वकील संघटनेची धुरा ॲड. सचिन वाघ यांच्या हाती.






