पंढरीच्या वाटेनं निघालेल्या भाविकाला बारामती भिगवण रस्त्यावर भरधाव कारनं चिरडलं
दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि इंदोरी गावावर शोककळा पसरली.

पंढरीच्या वाटेनं निघालेल्या भाविकाला बारामती भिगवण रस्त्यावर भरधाव कारनं चिरडलं
दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि इंदोरी गावावर शोककळा पसरली.
बारामती वार्तापत्र
विठुरायाला भेटण्यासाठी वर्षभर वाट पाहिली आता आषाढी वारीतून चालत त्याच्या भेटीला निघालेल्या माऊलींच्या डोळ्यातली स्वप्न अधुरीच राहिली. विठुरायाला भेटण्याची आस मनात होती, विठ्ठलाचं नाव मुखात होतं.
विठ्ठलाच्या भेटीची आस मनात घेऊन, मुखाने ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या एका वारकऱ्याची आणि विठुरायाची वाटेतच ताटातूट झाली.
बारामतीमध्ये काल रात्री झालेल्या एका भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात एका ज्येष्ठ वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि इंदोरी गावावर शोककळा पसरली.
हॉटेल शिवदुर्गसमोर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात बारामतीमधील भिगवण रोडवर असलेल्या हॉटेल शिवदुर्गसमोर काल रात्री घडला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या मागे चालणाऱ्या १९ क्रमांकाच्या दिंडीचे मालक रमेश गायकवाड यांच्या दिंडीतील वारकरी रस्त्यावरून पायी चालत जात होते. त्याच वेळी मागून आलेल्या एका अतिशय भरधाव आणि अनियंत्रित कारने या वारकऱ्याला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, कारच्या धडकेमुळे वारकऱ्याचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला.






