स्थानिक

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध आहेत.

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध आहेत.

पुणे;प्रतिनिधि

पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांसाठी कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती योजना २०२६-२७ राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी किंवा पदवी परीक्षा ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.

शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध आहेत. संबंधित माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवांनी आपल्या पाल्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  • शिष्यवृत्ती योजना : २०२६-२७
  • पात्रता : १० वी, १२ वी किंवा पदवी परीक्षेत किमान ६०% गुण
  • लाभार्थी : माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांचे पाल्य
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : १५ सप्टेंबर २०२६
  • अर्ज उपलब्ध : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D