कारने दुचाकीला उडवलं; बारामती MIDCतील भीषण अपघातात दोन महिलांचा बळी
संगीता लोंढे आणि मनीषा शिंदे यांचा अपघातात

कारने दुचाकीला उडवलं; बारामती MIDCतील भीषण अपघातात दोन महिलांचा बळी
संगीता लोंढे आणि मनीषा शिंदे यांचा अपघातात
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या एमआयडीसी परिसरात फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ कार आणि दुचाकीची भीषण धडक होऊन दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता लोंढे (वय 33) आणि मनीषा शिंदे (वय 43), दोघीही राजाळे, ता. फलटण, जि. सातारा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघीही बारामती एमआयडीसीतील ड्रीम प्लास्ट कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होत्या.
कामावरून जात असताना किंवा परतत असताना फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात दोघींनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कसा घडला, कारचालकाची स्थिती काय होती आणि अपघातास कारणीभूत ठरलेली परिस्थिती याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.
या घटनेने बारामती MIDC परिसरातील कामगार वर्गात तसेच राजाळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताबाबत अधिकृत पोलिस तपास व पुढील माहिती समोर आल्यानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.






