आपला जिल्हा

शहा ग्लोबल स्कूलमध्ये चिमुकल्या गोपाळांचा जल्लोष; राधा-कृष्णाच्या रूपाने रंगली दहीहंडी

कोशिश करने वालों की हार नहीं होती’

शहा ग्लोबल स्कूलमध्ये चिमुकल्या गोपाळांचा जल्लोष; राधा-कृष्णाच्या रूपाने रंगली दहीहंडी

कोशिश करने वालों की हार नहीं होती’

इंदापूर

इंदापुरातील शहा ग्लोबल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राधा-कृष्णाच्या मनमोहक वेशभूषेने तसेच गोपाळांच्या मानवी मनोऱ्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यामुळे शाळेचा परिसर जणू गोकुळनगरीतच परिवर्तित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या नृत्याचे मार्गदर्शन विद्या कराडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी साकारलेले मानवी मनोरे. चिमुकल्या गोपाळांनी एकजुटीचे आणि सांघिक प्रयत्नांचे दर्शन घडवत मानवी मनोरा उभारला. त्यानंतर दहीहंडी फोडताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. या सादरीकरणासाठी संकते माने यांनी मार्गदर्शन केले.दहीहंडीची आकर्षक सजावट ऐश्वर्या काटे व नेहा राऊत यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता चव्हाण यांनी केले.

या वेळी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी मुकुंद शहा, अंकिता शहा, नगराध्यक्ष भरत शहा, वैशाली शहा, तसेच शाळेचे आधारस्तंभ अंगद शहा व रुचिरा शहा उपस्थित होते. प्राचार्या वैष्णवी देशपांडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यवस्थापकीय सदस्य अंगद शहा यांनी ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ हा प्रेरणादायी संदेश दिला. यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असून, अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.

श्रीकृष्णाच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या उत्सवामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व व्यवस्थापनाने आनंदाचे क्षण अनुभवले. संस्कृती, परंपरा, सांघिक भावना आणि प्रेरणेचा सुंदर संगम घडविणारा हा दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

Back to top button