सुनेत्रा वहिनींचा टोला अन् सुप्रिया सुळे माघारी! ‘हात जोडून सांगते, आजपासून या विषयावर बोलणार नाही’
अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबात पुन्हा ठिणगी!

सुनेत्रा वहिनींचा टोला अन् सुप्रिया सुळे माघारी! ‘हात जोडून सांगते, आजपासून या विषयावर बोलणार नाही’
अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबात पुन्हा ठिणगी!
पुणे : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अपघाताच्या चौकशीच्या मागणीवरून पवार कुटुंबातील राजकीय मतभेद पुन्हा समोर आले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत सरकार आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
यावर सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता प्रत्युत्तर देताना, “अजितदादांच्या निधनानंतर कुटुंबावर काय दु:ख कोसळले, याची उणीव आम्हाला कळते. या विषयाचे राजकारण करू नये,” अशी भूमिका मांडली. तपास यंत्रणा आपले काम करत असून त्यांना वेळ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांच्या या भूमिकेनंतर सुप्रिया सुळे यांनी “हात जोडून सांगते, आजपासून अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या विषयावर मी यापुढे बोलणार नाही,” असे स्पष्ट केले.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे पवार कुटुंबातील राजकीय संबंध आणि अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.






