अजितदादांच्या जयंतीचा ‘हरित संकल्प’! सहारा फाउंडेशनच्या वतीने बारामतीत वृक्षारोपण
जयंतीनिमित्त ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश

अजितदादांच्या जयंतीचा ‘हरित संकल्प’! सहारा फाउंडेशनच्या वतीने बारामतीत वृक्षारोपण
जयंतीनिमित्त ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश
बारामती वार्तापत्र
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ सहार फाउंडेशनच्या वतीने बारामतीत वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला युवा नेते श्री. जय अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जय पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमातून अजितदादांच्या सामाजिक आणि विकासाभिमुख विचारांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी जय पवार यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती जाणून घेत शिक्षणासोबतच समाजाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि युवकांच्या प्रगतीला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा उपक्रम त्यांच्या विचारांना कृतीतून पुढे नेणारा ठरला.
कार्यक्रमाला सहार फाउंडेशनचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.






