राजकीय

बारामती तालुक्यातील वंजारवाडीच्या उपसरपंचपदी संगीता मालुसरे यांची बिनविरोध निवड!

ग्रामपंचायतीच्या कारभाराला मिळणार नवी दिशा

बारामती तालुक्यातील वंजारवाडीच्या उपसरपंचपदी संगीता मालुसरे यांची बिनविरोध निवड!

ग्रामपंचायतीच्या कारभाराला मिळणार नवी दिशा

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत वंजारवाडीच्या उपसरपंचपदी सौ. संगीता मारुती मालुसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले.

ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश लव्हटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संगीता मालुसरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच जगन्नाथ वनवे, सदस्य भारत चौधर, सौ. शशिकला जगताप, सौ. दिपाली चौधर, बाबासाहेब ठोकळे, सौ. चिन्मयनंदा चौधर, माजी उपसरपंच सागर दराडे, गोरख चौधर यांच्यासह ग्रामस्थ शरद चौधर, नितीन चौधर, नवनाथ चौधर, पोपट जगताप, संदीप मालुसरे, अक्षय जगताप, नवनाथ जगताप, नरेंद्र मालुसरे, रविंद्र जगताप, मारुती मालुसरे, श्रीकांत पिसाळ, नवनाथ मालुसरे, प्रतीक मालुसरे, तानाजी मालुसरे उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचारी मारुती खोमणे, पिंटू सावंत, बाळू सोनवणे, सोमनाथ कुंभारकर आणि राजू चौधर यांचीही उपस्थिती होती.

‘शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार’

उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर संगीता मालुसरे यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह ग्रामपंचायतीचा कारभार उत्तम प्रकारे करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button