‘गणरायाच्या’ चरणी जलाभिषेकाची संधी! बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात
श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल

‘गणरायाच्या’ चरणी जलाभिषेकाची संधी! बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात
श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल
बारामती | प्रतिनिधी
अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिरात भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून, गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक मोरगावमध्ये दाखल झाले आहेत.
या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे भाविकांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून गणरायाच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दर्शन आणि जलाभिषेकासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
वर्षभरात भाद्रपद आणि माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. या काळात श्रींच्या मूर्तीला जलाभिषेक करण्याची संधी भाविकांना मिळत असल्याने गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने मोरगाव येथे येतात.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ‘मोरया… मोरया…’च्या जयघोषाने मोरगाव नगरी दुमदुमून गेली आहे.
याबाबत श्री मयुरेश्वर मंदिराचे विश्वस्त देवराज डहाळे यांनी भाविकांच्या सहभागाबाबत माहिती दिली.






