बारामतीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौरव
स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; निलेशभाई कोठारी यांचा सत्कार

बारामतीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौर
स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; निलेशभाई कोठारी यांचा सत्कार
बारामती वार्तापत्र
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत विविध उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम् चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांना अभिवादन करत स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमास तहसीलदार स्वप्निल रावडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती म्हसके, पुणे जिल्हाध्यक्ष एम.आय एम फैयाज इलाही शेख, अशोकराव इंगुले, अॅड. आकाश मोरे, अॅड. जी. बी. गावडे, श्यामसुंदर पोटरे, स्वातंत्र्यसैनिक पत्नी श्रीमती लिलावती तावरे, नगरसेविका अविश्वनी सुरज सातव, मंगल शिवाजीराव जगताप, सुप्रिया सोलांकुरे, वैभव कोठारी, नाभिराज कोठारी, सुभाष कोठारी तसेच जिवाभाई कोठारी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सोलांकुरे यांनी बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेला दोन हजार रुपयांची आर्थिक मदत केली. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून या मदतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
स्वच्छता अभियानातून गांधी विचारांना अभिवादन
भटक्या-विमुक्तांचे नेते कै. मारुतराव जाधव प्रतिष्ठान, बारामती यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त नेवसे रोड, लालबिगे चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला दिलेले महत्त्व लक्षात घेऊन जयंतीदिनी प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याने कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली. स्वच्छ परिसर आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार
यानंतर भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शास्त्री यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
याच कार्यक्रमात निलेशभाई कोठारी यांची स्वातंत्र्यसैनिक संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुष्पहार व सन्मान करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कार समारंभास विश्वासराव शेळके, दिलीप तांबे, कबीरभाई तांबोळी, सचिन भोसले, पोपट गादिया, अॅड. मुकुंद बडवे, अॅड. इन्क्लाब शेख, अॅड. रमेश कोकरे, रंजना साळुंके, श्रीराम देशमुख, महावीर शहा, मोरे, पवन घोरपडे, सदानंद करंदीकर, रणदिवे, दिलीप तांबे ,अक्षय मुळीक, जीवन मोदी, मोहन मोरे, अॅड. अजित कोकरे, फिरोजभाई शेख, अॅड. सोहेल शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.
गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण, स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान आणि स्वच्छतेचा सामाजिक संदेश अशा विविध माध्यमातून जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला.






