आधुनिक गीतांनी रंगला पारंपरिक महाभोंडला; इंदापुरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मैत्रीण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर यांच्या हस्ते उद्घाटन
आधुनिक गीतांनी रंगला पारंपरिक महाभोंडला; इंदापुरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मैत्रीण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर यांच्या हस्ते उद्घाटन
इंदापूर, –
आधुनिक गीतांचा ठेका, पारंपरिक भोंडल्याची संस्कृती आणि महिलांच्या उत्साहाने इंदापुरातील महाभोंडला महोत्सव रंगतदार झाला. भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुका यांच्या वतीने (दि.१२) सायंकाळी ७ वा. नगरपालिका शेजारील जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २ येथे भव्य महिला महाभोंडला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मैत्रीण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच लोकनेते प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवात पारंपरिक भोंडल्याला आधुनिक गीतांची जोड मिळाल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भोंडल्याच्या पारंपरिक गाण्यांसोबत आधुनिक गीतांच्या तालावर महिलांनी आनंद लुटत सांस्कृतिक सोहळ्याची रंगत वाढवली.यावेळी महिलांना फराळाचे देखील वाटप करण्यात आले.

भोंडला हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पारंपरिक उत्सव आहे. महिलांनी एकत्र येऊन फेर धरत गाणी म्हणणे, नृत्य करणे आणि आनंदाचे क्षण साजरे करणे, ही या उत्सवाची खासियत आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक गीतांची जोड मिळत असतानाही पारंपरिक उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा सुंदर प्रयत्न या महाभोंडला महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला.







