करण खलाटेंचा थेट मंत्र्यांना फोन! दुसऱ्याच दिवशी १३० तपासणी यंत्रांचे वितरण; बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत मोठी घडामोड!
होळमधून उठलेला आरोग्याचा आवाज जिल्हाभर पोहोचला!

करण खलाटेंचा थेट मंत्र्यांना फोन! दुसऱ्याच दिवशी १३० तपासणी यंत्रांचे वितरण; बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत मोठी घडामोड!
होळमधून उठलेला आरोग्याचा आवाज जिल्हाभर पोहोचला!
बारामती वार्तापत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्याबाबत अखेर मोठी घडामोड समोर आली आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता मोदींचा प्रस्तावित बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आला असून, या वास्तूचे उद्घाटन येत्या १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. स्वतः शरद पवार यांनी ही माहिती दिल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
विशेष म्हणजे, या उद्घाटन सोहळ्यासाठी यापूर्वी ३ नोव्हेंबर आणि त्यानंतर १६ नोव्हेंबर अशा दोन तारखा चर्चेत होत्या. मात्र, दोन्ही वेळेस पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा होऊ शकला नाही. त्यामुळे मोदी बारामतीत येणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू होते. अखेर आता उद्घाटनाची तारीख १२ डिसेंबर निश्चित झाली असून, हा सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे.
मोदींच्या निमंत्रणावरून रंगला होता राजकीय वाद!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीत निमंत्रित करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. देशभरात एसआयआर (SIR) मुद्द्यावरून इंडिया आघाडीकडून केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली जात असताना, इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना बारामतीत का बोलवावे, असा सवाल विरोधक आणि टीकाकारांकडून उपस्थित करण्यात आला होता. या निमंत्रणावरून पवारांवर टीकेची झोडही उठली होती.
मात्र, आता मोदींचा दौरा तूर्तास रद्द झाल्याने या राजकीय चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. दौरा रद्द होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाची उपस्थिती; चर्चांना नवे वळण!
दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी सकाळी शरद पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानला भेट देत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, जय पवार आणि युगेंद्र पवार हेही उपस्थित होते. गेल्याच महिन्यात जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
मतदारसंघ पुनर्रचना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील प्रमुख सदस्यांची एकत्रित उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या बैठकीत संस्थेच्या कामकाजासोबत अन्य विषयांवरही चर्चा झाली का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.
एकीकडे पंतप्रधान मोदींच्या बहुचर्चित बारामती दौऱ्याला तूर्तास पूर्णविराम, तर दुसरीकडे शरद पवारांच्या हस्ते १२ डिसेंबरला प्रेरणास्थळाचे उद्घाटन! मोदींच्या निमंत्रणावरून सुरू झालेला राजकीय वाद आणि आता बदललेले उद्घाटनाचे नियोजन यामुळे बारामतीच्या राजकारणात या सोहळ्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.






