स्थानिक

बारामतीत २२ नोव्हेंबरला आरोग्याचा जागर! नैसर्गिक प्रसूतीसाठी भव्य जनजागृती पदयात्रा; आई-बाळाच्या सुरक्षिततेचा संदेश!

सकाळी ७.३० वाजता बारामती शहर पोलीस स्टेशन येथून सुरुवात होणार

बारामतीत २२ नोव्हेंबरला आरोग्याचा जागर! नैसर्गिक प्रसूतीसाठी भव्य जनजागृती पदयात्रा; आई-बाळाच्या सुरक्षिततेचा संदेश!

सकाळी ७.३० वाजता बारामती शहर पोलीस स्टेशन येथून सुरुवात होणार

बारामती वार्तापत्र 

आईचे आरोग्य, बाळाची सुरक्षितता आणि नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामतीत रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी विशेष जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सोसायटी ऑफ मिडवाइव्ह्ज इंडिया’ (SOMI) यांच्या वतीने ‘राष्ट्रव्यापी नैसर्गिक प्रसूती जनजागृती पदयात्रा’ काढण्यात येणार असून, या माध्यमातून सुरक्षित मातृत्वाचा जागर केला जाणार आहे.

या पदयात्रेला सकाळी ७.३० वाजता बारामती शहर पोलीस स्टेशन येथून सुरुवात होणार असून, नटराज नाट्य कला मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होईल.

नैसर्गिक प्रसूतीचे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करणे, सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती करणे तसेच वैद्यकीयदृष्ट्या अनावश्यक हस्तक्षेप टाळण्याबाबत समाजात योग्य माहिती पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या जनजागृती पदयात्रेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय परिचर्या महाविद्यालय, शारदाबाई पवार कॉलेज ऑफ नर्सिंग आणि गिरीराज नर्सिंग स्कूलमधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक सहभागी होणार आहेत.

नैसर्गिक प्रसूतीचा सन्मान, सुरक्षित मातृत्वाचा अभिमान! हा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी बारामतीकरांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button