शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या करा…शिक्षक संघाची शरद पवारांकडे मागणी.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली.
शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या करा…शिक्षक संघाची शरद पवारांकडे मागणी.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून विस्थापित शिक्षकांना प्राधान्य देण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे, २७ फेब्रुवारी १७ च्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे या बदल्या होत आहेत, जुन्या शासन निर्णयामुळे या वर्षी विस्थापित , रँडम राउंड मधील शिक्षक, समाणिकरणामध्ये तालुकाबाह्य बदली झालेले तसेच आंतर जिल्हा बदलीने आलेले शिक्षक यांना कोणतेही प्राधान्य मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे, प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बदली धोरणात दुरुस्ती करून सोयीच्या बदल्या करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शासनाने संघटनांची भूमिका समजून घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीआयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली होती, या अभ्यासगटाचा अहवाल प्रतीक्षेत असतानाच अचानक राज्य सरकारने ३१ जुलै पूर्वी बदल्या करण्यास सुचविले आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोयीच्या बदल्यांसाठी राज्य सरकारशी चर्चा करावी अशी मागणी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांभारे व शिक्षक संघ पदाधिकारी यांनी केली आहे
समाणिकरणास विरोध…
बदली धोरणामध्ये समाणिकरणाच्या नावाखाली सोयीच्या जागा रिक्त असूनही शिक्षकांना दिल्या जात नाहीत त्यामुळे बदली धोरणातून समाणिकरण वगळण्याची शिक्षक संघाची मागणी आहे.