डॉ. मनोज खोमणे यांच्या कामाचा गौरव.
कोरोना सारख्या जीवघेण्या आजारामुळे ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी उत्कृष्ट काम करत.
डॉ. मनोज खोमणे यांच्या कामाचा गौरव.
कोरोना सारख्या जीवघेण्या आजारामुळे ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी उत्कृष्ट काम करत.
बारामती;वार्तापत्र
कोरोना सारख्या जागतिक महामारीचे संकट अद्याप सर्वत्र कायम आहे. ही महामारी रोखण्यासाठी सर्व स्तरातून अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.
विशेषता यासाठी आरोग्य विभाग झटून काम करताना दिसून येत आहे. बारामती तालुक्यात कोविड नियंत्रणाकरिता उत्तम कामगिरी करत असलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचा आज बारामतीत सन्मान करण्यात आला आहे.
डॉ मनोज खोमणे हे कोरोना सारख्या जीवघेण्या आजारामुळे ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी उत्कृष्ट काम करत असल्याबद्दल बारामती एमआयडीसी येथील जी.टी.एन कंपनीच्या वतीने कंपनीचे मॅनेजर मिश्रा यांच्या शुभहस्ते व वल्लभ गावडे व कंपनीच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून उत्स्फूर्तपणे डाँँ.खोमणे यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसेच डॉ.खोमणे यांच्या शुभहस्ते कंपनीत वृक्षारोपण करून त्या वृक्षाला डाॅ मनोज खोमणे यांचे नाव देऊन गौरव करण्यात आला आहे.