कोरोना च्या काळात विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण मिळणार : अजित पवार.
‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात.
कोरोना च्या काळात विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण मिळणार : अजित पवार.
‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात.
बारामती वार्तापत्र
कोरोनाच्या संकट (Corana crises) काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थांना डिजिटल पातळीवर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .
यापार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
शासनाच्या ऑन लाईन शिक्षण बदल माहिती देताना अजित पवार यांनी ऑनलाइन पालक,विद्यार्थी यांच्या बरोबर संवाद साधला या वेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी ‘जी स्वीट’ आणि राज्य शाळांकरिता ‘गुगल क्लास’ रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात, असेही पवार म्हणाले .
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गूगल क्लासरूम’, ‘गूगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.