इंदापूर

बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना अंकिता पाटील यांनी सुरक्षा साहित्याचे केले वाटप.

कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी होणार मदत.

बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना अंकिता पाटील यांनी सुरक्षा साहित्याचे केले वाटप.

कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी होणार मदत.

बारामती वार्तापत्र इंदापूर:-प्रतिनिधी
सध्या कोरोणाची परिस्थिती भयंकर होत चालली असून कम्युनिटी स्प्रेड (समुदाय प्रसार) च्या माध्यमातून अनेक जण कोरोणा बाधित होत आहेत.या कोरोणा बाधित रुग्णांना किंवा संशयित रुग्णांना उपचार करते वेळी डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य करत आहेत. डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागणारे साहित्य अंकिता पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या कोविड कॅश कार्ड अंतर्गत तीन लाख रूपये रक्कमेचे पी.पी. ई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते बावडा येथे बावडा आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना केले.

यावेळी बावडा गावचे सरपंच किरण पाटील, बावडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे,डॉ.स्नेहल पवार, डॉ.पानबुडे, डॉ.निकिता घोगरे, डॉ.वैशाली खाडे, डॉ.सुमति ढोले व इतर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button