लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे – मा.गृहराज्यमंत्री रमेश बागवे
बारामतीतील चिंतन बैठकीत मांडले विचार
लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे – मा.गृहराज्यमंत्री रमेश बागवे
बारामतीतील चिंतन बैठकीत मांडले विचार
बारामती वार्तापत्र
समाज आमची आई आहे, समाजानेच आम्हाला मोठे केले मात्र समाज एकसंघ राहिला पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणात समाजाला आरक्षण द्यावे. असे मत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी बारामती येथे चिंतन बैठकीत केले.
बिलोली येथील मूकबधिर मुलीचा अत्याचार करून खून केला मात्र या समाजाच्या अत्याचारावर राज्यातील एकाही पक्षाने आवाज उठविला नाही किंवा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला नाही.
समाजाने आता एकत्र आले पाहिजे. काही डोंगी पुढारी अण्णाभाऊंचे व लहुजींचे नाव घेऊन समाजाला वाईट मार्गाला लावत आहेत. अनेक जण नवीन नवीन संघटना काढतात मात्र चार महिन्यानंतर त्याचे काय होते. असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, छत्रपती शिवाजी राजांचे, विचार घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळ हे चालू करावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली
या कार्यक्रमासाठी संगीता लांडगे महिला अध्यक्ष बारामती, सुरज कुचेकर उपाध्यक्ष बारामती तालुका मातंग एकता आंदोलन उत्तम शिंदे कोअर कमिटी अध्यक्ष माऊली सोनवणे उपसचिव बारामती ,बापूराव बागाव ,कार्याध्यक्ष लक्ष्मण खंडाळे उपाध्यक्ष बारामती, पांडुरंग आवारे सचिव बारामती