शैक्षणिक

टेक्निकल मध्ये मुक्तछंद प्रकल्पाचे आयोजन

नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

टेक्निकल मध्ये मुक्तछंद प्रकल्पाचे आयोजन

नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्था यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष 2025 मधील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी रयत गुरुकुल मुक्तछंद वर्ग प्रकल्प दिनांक 15 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी बारामती शहरातील राधेश्याम एन अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि जूनियर कॉलेज बारामती विद्यालयातील इयत्ता पाचवी व सहावीचे विद्यार्थी तसेच विद्यालयांमध्ये प्रवेश घेणारे इयत्ता चौथीचे विद्यार्थी यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे, यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिसरातील शाळांना भेट देऊन चौथीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयात आमंत्रित करण्यात आले.

नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री भगवान भिसे साहेब, गुरुकुल समन्वयक श्री दत्तात्रय पांढरे सर, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रयत गुरुकुल मुक्तछंद प्रकल्पांतर्गत कु.अक्षदा सुभेदार मॅडम आणि श्रीम. कोमल हिरवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रयोगशाळेमधील इयत्ता पाचवी चे विद्यार्थी संगणक प्रात्यक्षिक केले. गुरुकुल प्रमुख श्री अरविंद मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी चे विद्यार्थ्यांनी इंटरॅक्टिव्ह पॅनल इंग्रजी कम्युनिकेशन सादरीकरण दाखविले व मार्गदर्शन केले श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडांगणावर इयत्ता पाचवी चे विद्यार्थी लंगडी खेळाचे प्रात्यक्षिक केले, सौ भोंग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर ऍक्टिव्ह पॅनल इयत्ता पाचवी चे विद्यार्थी कर्मवीर अण्णांच्या जीवनावरील व्हिडिओ दाखविला,गुरुकुल मुक्तछंद प्रकल्पांतर्गत माननीय प्राचार्यांच्या उपस्थित श्री मोहिते सर सौ भोंग मॅडम श्री जगताप सर श्री भालके सर श्री भिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खाऊ वाटप इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना केले.2025-2026 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे,याची माहिती उपशिक्षक श्री विकास जाधव यांनी दिली.

यावेळी प्राचार्य श्री भगवान भिसे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे , पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर, उपस्थित होते.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_