स्थानिक

बारामती आगारातून लालपरी रस्त्यावर…

जेजुरी २, निरा ६, वालचंदनगर २, भिगवन २, फलटण २ या मार्गावर १४ बसेस सोडण्यात आल्या

बारामती आगारातून लालपरी रस्त्यावर…

जेजुरी २, निरा ६, वालचंदनगर २, भिगवन २, फलटण २ या मार्गावर १४ बसेस सोडण्यात आल्या

बारामती वार्तापत्र

गेल्या महिन्याभरापासून बंद असणारे बारामती आगार आज पासून सुरू झाले आहे. सध्या बारामती तालुक्यातील लोकल रूटच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच जे आगार सुरू आहे. त्या मार्गावर ही गाड्या सोडणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात बारामती आगार ही सहभागी झाले होते.

दिनांक ८ नोव्हेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी बारामती आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. दरम्यान एसटी बंद असल्याने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन एसटीचे वरिष्ठ अधिकारी रमाकांत गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांशी वारंवार चर्चा करून संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आव्हान केले होते.

सध्या शाळा- महाविद्यालये सुरु असल्याने विद्यार्थ्यांनाही आपली हक्काची एसटी सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे. एक महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर बारामतीतून लालपरी धावली. गेल्या महिन्याभरापासून बंद असणारे बारामती आगार रविवारपासून सुरू झाले आहे. सध्या बारामती तालुक्यातील लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच जे आगार सुरू आहे.

त्यानुसार आज कर्मचाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत कामावर रुजू होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यानुसार आज बारामती आगरातून जेजुरी २, निरा ६, वालचंदनगर २, भिगवन २, फलटण २ या मार्गावर १४ बसेस सोडण्यात आली असल्याची माहिती बारामती आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी माहिती दिली.

Check Also
Close
Back to top button