अंजनगाव येथे तुळजाराम चतुरचंदमहाविद्यालय, बारामती राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
शिबिरात एकूण १६० स्वयंसेवक सहभागी

अंजनगाव येथे तुळजाराम चतुरचंदमहाविद्यालय, बारामती राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
शिबिरात एकूण १६० स्वयंसेवक सहभागी
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती व राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ फॉर माय भारत, डिजिटल लिटरसी, विशेष श्रमसंस्कार शिबीर रविवार दि. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले होते.
या निवासी शिबिरात एकूण १६० स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा को-ओर्डीनेटर डॉ.विलास कर्डीले, कार्यक्रम अधिकारी डॉ.निरंजन शहा, प्रा.महारुद्र दुधे यांनी ग्रामस्वच्छता अभियान, कॅशलेस इंडिया, युथ फॉर माय भारत, पथनाट्यातून जनजागृती, सेंद्रिय शेती या विषयावर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे महत्व, वृक्षारोपण या कामांवर भर दिला. विद्यार्थ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी स्मार्ट सुनबाई अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, अंजनगावचे सरपंच प्रतिभा परकाळे, उपसरपंच नामदेव परकाळे जालिंदर वायसे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दादासाहेब मोरे, उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, डॉ.अजित तेळवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या समारोप समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा को-ओर्डीनेटर डॉ.विलास कर्डिले, सूत्रसंचालन सोमनाथ कदम तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.महारुद्र दुधे यांनी मानले.