मुंबई

अजितदादा म्हणतात, ‘इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती’

प्रसारमाध्यमांनी या सगळ्या गोष्टींना फार महत्व देऊ नये

अजितदादा म्हणतात, ‘इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती’

प्रसारमाध्यमांनी या सगळ्या गोष्टींना फार महत्व देऊ नये

मुंबई: ,प्रतिनिधी

अभिनेत्री केतकी चितळे हिने अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या गोष्टींना फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले. आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्रात एक परंपरा चालत आली आहे. कसं बोलावं, काय बोलावं, याचं प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. हे जे काही बोलतायत ही एक विकृती आहे. अशा पद्धतीने कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही.

राजकीय वेगळे विचार असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, आणि सत्ताधारी असोत किंवा विरोधक असू दे अशापद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो असं अजित पवार यांन म्हटलं आहे.

औरंगाबजेब कबरीवरुन सुरु झालेल्या वादाला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचंही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आपल्या पुढे आता वेगळे प्रश्न आहेत. जी व्यक्ती तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी गेली, तो विषय आता उगाळून काय फायदा, काही लोकांनी जाणीवपूर्वक बाहेरुन यायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही अशा प्रकारचं कृत्य करायचं हे बरोबर नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे,

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमची पोलीस यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत आहेत, त्यावेळी  इतरांनीही जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!