
इंदापूरमध्ये भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन
तरुणांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवारी (दि.१८) शहा संस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदापूर शहर व तालुक्यातील युवक-युवतींच्या उज्वल भविष्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग,फायनान्स रिटेल,सेल्स मार्केटिंग,बँकिंग,इन्शुरन्स,हॉस्पिटॅलिटी,फॅसिलिटी टेलिकॉम,आयटी,बी.पी.ओ,के.पी.ओ,फार्मा अशा विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी परिचय पत्रासह आवश्यक कागदपत्रे घेऊन समक्ष कार्यक्रम ठिकाणी येण्याचे आवाहन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले आहे.
तसेच नोंदणीसाठी ९९२१७७७८८९ व ९६६५१८६५४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा असे शहा यांनी सांगितले.