इंदापूरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या,2 लाख 50 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त ; गुन्हे शाखेची कारवाई

4 किलो 160 ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ जप्त

इंदापूरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या, 2 लाख 50 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त ; गुन्हे शाखेची कारवाई

4 किलो 160 ग्रॅम गांजा हा अमली (गांजा) हा पदार्थ जप्त

इंदापूर प्रतिनिधी –

इंदापूर तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी जोरात सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत असून,गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्कराच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 50 हजारांचा 4 किलो 160 ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ जप्त केला आहे.लोणी देवकर (ता.इंदापूर ) येथील हॉटेल मथुराज परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पिक्या भानुदास काळे (वय 28 वर्षे, रा. काटी ता.इंदापूर,जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते,सहाय्यक फौजदार प्रकाश माने, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे,अंकुश माने,विशाल चौधर,तुषार चव्हाण यांनी केली आहे.

इंदापूर तालुक्यात अमली पदार्थ तस्कारांवर नजर ठेवून त्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांत अमली पदार्थ तस्कारीचे मोठी प्रकरणे देखील समोर आली आहेत. या दरम्यान, एकजण अमली (गांजा) पदार्थ घेऊन लोणी देवकर (ता.इंदापूर ) येथील हॉटेल मथुराज जवळ त्याच्या बुलेट मोटरसायकल वरून परिसरात विक्री करण्यासाठी येणार आहे,असे समजताचं त्यानुसार, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणी सापळा लावून त्याला पकडले.त्याची झडती घेतली असता अमली (गांजा) हा पदार्थ मिळून आला. त्यानी हा अमली पदार्थ कोठून आणला होता तसेच तो कोणाला देणार होता,याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!