कोट्यवधी खर्चून उभारलेले बारामती क्रीडा संकुल पावसात गळतीच्या विळख्यात; बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह
संबंधित बांधकामाच्या दर्जाबाबत आणि कामाच्या गुणवत्तेबाबत शंका

कोट्यवधी खर्चून उभारलेले बारामती क्रीडा संकुल पावसात गळतीच्या विळख्यात; बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह
संबंधित बांधकामाच्या दर्जाबाबत आणि कामाच्या गुणवत्तेबाबत शंका
बारामती वार्तापत्र
बारामतीतील देसाई इस्टेट परिसरात उभारण्यात आलेल्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलामध्ये पावसाळा सुरू होताच छताला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अद्याप इमारत तुलनेने नवीन असतानाच विविध ठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलातच पावसाचे पाणी थेट आत आल्याने खेळाडू, पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अशा प्रकारे गळती होणे म्हणजे संबंधित बांधकामाच्या दर्जाबाबत आणि कामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण करणारे असल्याची चर्चा सुरू आहे.
पावसाळ्यात अशा गळतीमुळे खेळाडूंच्या सरावात अडथळे निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच गळतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या गळतीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष पाहणी करून गळतीचे कारण, बांधकामाचा दर्जा आणि कामाची गुणवत्ता याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही जोर धरत आहे.






