स्थानिक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश सोनवणे; नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांची अध्यक्षपदी निवड

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश सोनवणे; नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांची अध्यक्षपदी निवड

बारामती वार्तापत्र 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश शिवराम सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रतिभा संजय मोरे, सचिवपदी धनपाल विश्वनाथ भोसले, सहसचिवपदी सुशील कुमार सोनवणे, तर खजिनदारपदी विजय नामदेव सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवड प्रक्रियेवेळी माजी अध्यक्ष अशोक (अण्णा) सोनवणे, संजय मोरे तसेच दयानंद मिसाळ प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश शिवराम सोनवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून वंचित व गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

त्यांच्या सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी गणेश सोनवणे यांनी वस्तीगृहाच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे जपत सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधवांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण हितासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Back to top button