इंदापूरात चारचाकी मोटारच्या काचा फोडून 2 लाख रुपयांची चोरी
अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

इंदापूरात चारचाकी मोटारच्या काचा फोडून 2 लाख रुपयांची चोरी
अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये भर दुपारी लावलेल्या चारचाकी मोटारच्या काच फोडून 2 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पांडुरंग पोपट शिंदे (वय 35 वर्षे, व्यवसाय शेती, रा. अवसरी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि.6) मार्च रोजी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान शहरातील तहसील कार्यालयात लावण्यात आलेल्या चारचाकी मोटारमधून अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून पिशवीमध्ये ठेवलेली 2 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुकुमार भोसले करत आहेत.