इंदापूरात ज्येष्ठ नागरिक संघास दहा लाखांना गंडा
नितीन टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीचे नितीन भारत पांडगळे याने गंडविले

इंदापूरात ज्येष्ठ नागरिक संघास दहा लाखांना गंडा
नितीन टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीचे नितीन भारत पांडगळे याने गंडविले
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील व तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठ नागरिकांकडून सहलीसाठी विमान प्रवास, निवास, नाष्टा व भोजन खर्च म्हणून नितीन ट्रॅव्हल कं. चालक मालक नितीन भारत पांडगळे (रा. टेभुर्णी) याने फसवणूक केल्याबद्दल अखेर इंदापूर न्यायालयात २१ मार्च रोजी केस दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती सहल प्रमुख बाबासाहेब निवृत्ती घाडगे यांनी दिली.
नितीन भारत पांडगळे याने इंदापूर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे गुजरात दर्शन सहलीचे नियोजन करून, ज्येष्ठ नागरिक संघाकडून सहलीतील सहभागी ४४ सदस्यांकडून ९ लाख ७४ हजार इतकी रोख रक्कम व काहींचे ऑनलाइन घेऊन सहलीचे वेळापत्रक तयार करून, पुणे ते अलाहाबाद या टाटा इंडिगो विमानाची बोगस तिकीटे बुक करुन, ज्येष्ठ नागरिक संघास पाठविली. २५ नोव्हेंबर रोजी सर्व सहल सभासद सकाळी ८:३० वाजता ठरल्याप्रमाणे इंदापूर कॉलेजसमोर जमा झाले. त्यानंतर गुजरात दर्शन व्हॉट्सअप ग्रुपवरनितीन पांडगळे याने स्वतःचा भाऊ सचिन पांडगळे अपघातात मरण पावला आहे. इंग्रजी रिप असा मेसेज रात्री १० वाजता टाकल्याचे निदर्शनास आले. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे निवडक सभासद, टेभुर्णी येथे पांडगळे परिवाराच्या दुः खात सहभागी होण्यास गेले असता, समक्ष चौकशीनंतर पांडगळे याने सहलीचे घेतलेले सर्व पैसे इतरत्र खर्च झाल्याने सहल घेऊन जाणे शक्य नाही, म्हणून तो फरार झाला होता. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक संघाकडून इंदापूर पोलीस स्टेशनला २८ नोव्हेंबर रोजी तक्रार अर्ज दिल्याने नितिन पांडगळे पोलीस स्टेशनला हजर होऊन, झालेल्या चुकीबद्दल माफी मागून ज्येष्ठ नागरिक संघाकडून सहलीसाठी घेतलेले पैसे माझ्याकडून इतरत्र खर्च झाले असून, ती सर्व रक्कम ही तीन हप्त्यात देण्यासाठी तीन चेक देऊन, नोटरी करून दिले; परंतु दिलेले तीनही चेक बँकेतून पास न झाल्याने खोटे चेक देऊन पुन्हा फसवणूक केल्याबद्दल इंदापूर न्यायालयात न्या भा. का. क. १३८ अन्वये चा गुन्हा दाखल केला, अशी माहीती सहलप्रमुख घाडगे सर तत्कालीन संघ अध्यक्ष चित्तरंजन पाटील, सहल उपप्रमुख भानुदास पवार व संघ सचिव हनुमंत शिंदे यांनी सर्व सभासदांना दिली आहे.