इंदापूर

इंदापूर तालुक्यात दलित वस्ती नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लाख निधी मंजूर

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर तालुक्यात दलित वस्ती नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लाख निधी मंजूर

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरी सुविंधासाठी २५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५ कोटी ५० लाख तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून १० कोटी असे एकूण इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरी सुविधांकरिता २५ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असून निश्चितच या निधीतून होणाऱ्या कामांमुळे दलित बांधवांना चांगल्या प्रतिच्या सोयी सुविधा उपलब्ध होतील असे भरणे यांनी सांगितले.

सदरच्या निधीतून वालचंदनगर येथील १४३ चाळ येथे बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये, सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये तर १४४ चाळ येथे बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये, रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये, सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये ही विकासकामे होणार आहेत.त्याचबरोबर वालचंदनगर येथील आंबेडकर नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये, बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये,मानेवस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये,बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.तर वालचंदनगर येथील लोहारवस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये,बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये या कामांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त वालचंदनगर येथील गायकवाड वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये,बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये, तीन चाळ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये,बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये, धवलपुरी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये,बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये तर सेवा काॅलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख रुपये,बंदिस्त गटार करणे १० लाख रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.तर इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील अ.जा.वस्ती रस्ता काँक्रेटीकरण करणे २० लाख,साबळे वस्ती ९ ,साबळे वस्ती २, आणि साबळे वस्ती ४ येथे रस्ता काँक्रेटीकरण करणे साठी प्रत्येकी २० लाख मंजूर करण्यात आले आहेत.

भरणेवाडी येथील खरात वस्ती येथील रस्ता काँक्रेटीकरण करणे यासाठी २० लाख मंजूर करण्यात आले आहेत. वडापूरी येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे सांस्कृतिक भवन बांधकामासाठी २० लाख,लासुर्णे येथे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधकामासाठी २० लाख आणि नवदारे येथील बुध्दविहार परिसरात सुशोभिकरण करणेसाठी २० लाख,अजोती येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये नवीन बौध्द विहार इमारत तसेच समाज मंदिराला कम्पाउंड वाॅल व बैठकीकरिता कट्टा बांधकाम करणे या करिता १५ लाख,शेटफळगढे येथील बौध्द विहार परिसरात स्वागत कमान बांधणे करिता १० लाख,भवानीनगर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधणे करिता ५५ लाख,गिरवी येथे समाज मंदिर बांधणे २० लाख,कळाशी बौध्द विहार परिसरात पेव्हिंग ब्लाॅक बसवणे १० लाख, कडबनवाडी येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत जाधववस्ती येथे समाज मंदिर बांधणे १० लाख, चांडगांव येथील बौध्द समाज मंदिर व मातंग समाज मंदिर सुशोभिकरण करणे १० लाख,सणसर येथील अशोकनगर,खवळेवस्ती आणि सोनवणे,आवळे वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभिकरण करणे करिता प्रत्येकी १० लाख,निमसाखर येथील पिरवस्ती,मातंग वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभिकरण करणे १० लाख,गावठाण समाजमंदिर परिसर सुशोभिकरण करणे १० लाख रुपये,निरगुडे येथे सोनवणे वस्ती सामाजिक सभागृह बांधणे १० लाख,गावठाणात सामाजिक सभागृह बांधणे २० लाख,लुमेवाडी, निंबोडी येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच तक्रारवाडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृह बांधणे १५ लाख,डाळज नं.१ अंबिकानगर भोसले वस्ती सामाजिक सभागृह बांधणे १० लाख व अण्णाभाऊ साठे मंदिर सुशोभिकरण करणे १० लाख,गोतोंडी मोरे वस्ती नं.२ सामाजिक सभागृह बांधणे १० लाख,गिरवी येथे समाजमंदिर बांधणे २० लाख,अकोले येथे बौध्द विहार समाज मंदिर सभागृह बांधणे १० लाख,पोंधवडी अण्णाभाऊ साठेनगर येथे मातंग समाज मंदिर बांधणे १० लाख तर अण्णाभाऊ साठे परिसरात सुशोभिकरण करणे १० लाख,नरसिंहपूर येथे समाजमंदिर बांधणे २० लाख,काझड येथे मोरवाडा समाज मंदिर सुशोभिकरण व पेव्हींग ब्लाॅक बसवणे १० लाख,डाळज नं.३ देवकुळे,भोसले वस्ती समाज मंदिर बांधणे १० लाख,हगारेवाडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते ग्रा.पं.कार्यालय रस्ता काँक्रेट करणे १० लाख,जाचकवस्ती येथे समाज मंदिर बांधणे १५ लाख व लक्ष्मीमाता मंदिर समाजिक सभागृह बांधणे १० लाख, उध्दट येथील मातंग समाज मंदिर बांधणे व सुशोभिकरण करणे १० लाख,सपकळवाडी येथील मागासवर्गीय वस्ती येथे व्यायामशाळा बांधकाम करणे १० लाख व वाचनालय/अभ्यासिका बांधकाम करणेसाठी १० लाख,बेलवाडी झोपडपट्टी रस्ता करणे व मातंग वस्ती येथे रस्ता करणे यासाठी प्रत्येकी १० लाख,कळंब येथील मागासवर्गीय वस्ती येथे अभ्यासिका बांधकाम करणेसाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा परिषद दलितवस्ती सुधारणा योजनाअंतर्गत मंजूर निधी

अंथुर्णे करिता ६३ लाख,काझड ६ लाख, गलांडवाडी नं.२ करिता १५ लाख,गोतंडी ते गावठाण मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याकरिता ५ लाख, चिखली करिता २१ लाख,जाचकवस्ती करिता ३० लाख, निंबोडी करिता २३ लाख,निमसाखर करिता ७० लाख,निरगुडे करिता ६ लाख तर पिटकेश्वर करिता २० लाख, पोंधवडी करिता ४० लाख,बाभुळगाव करिता ३० लाख, बिजवडी ७६ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच बेलवाडी करिता ४० लाख, बोरी करिता १ कोटी ४२ लाख,म्हसोबाचीवाडी १२ लाख,रणगाव करिता ८० लाख,रुई ४७ लाख,लासुर्णे १ कोटी २० लाख, वरकुटे खुर्द ४० लाख,वालचंदनगर मधील लोहारवस्ती,गायकवाड वस्ती ३ चाळ, आंबेडकरनगर १४२ आणि १४४ चाळ करिता ७० लाख,व्याहळी २५ लाख,शहा ४२ लाख, शिंदेवाडी ६ लाख,शेटफळ हवेली २० लाख,सणसर १ कोटी ८ लाख,सपकळवाडी ४९ लाख,सरडेवाडी ६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.यावेळी मंत्री भरणे म्हणाले की,तालुक्यातील सर्वच घटकापर्यंत निधी देण्याचे काम करत आहोत या मध्ये अजून काही गावांचा अनुषेश भरून निघणार आहे. त्यामुळे अनेक गावातील कामे लवकरच मार्गी लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!