स्थानिक

इंदूरच्या धर्तीवर ‘स्वच्छ बारामती’स्वप्न धुळीस?उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी घाणीचे साम्राज्य

फ्लेक्सबंदीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही शहरात नव्याने १८ सांगाडे उभारले जात आहे.

इंदूरच्या धर्तीवर ‘स्वच्छ बारामती’स्वप्न धुळीस?उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी घाणीचे साम्राज्य

फ्लेक्सबंदीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही शहरात नव्याने १८ सांगाडे उभारले जात आहे.

बारामती वार्तापत्र

स्वच्छ व सुंदर शहराचा दावा करणाऱ्या बारामती नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे चित्र दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.

बारामतीतील विनोदकुमार गुजर विद्यालयाच्या मागील प्रवेशद्वाराजवळील ड्रेनेज लाईन अनेक दिवसांपासून तुंबले आहे. त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीमधून ये-जा करावी लागत आहे याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

ड्रेनेज सफाईसाठी लाखो रुपयांची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असतानाही प्रत्यक्षात कामे होत नाही. आरोग्य विभाग सर्व कामे केवळ कागदोपत्री आणि फोटोसेशनपुरतीच मर्यादित करत असल्याचा आरोप यावेळी नगरिकांनी केला आहे.
शहरात वाढत असलेल्या बेकायदेशीर होर्डिंग्जचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे.

फ्लेक्सबंदीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही शहरात नव्याने १८ सांगाडे उभारले जात आहे. दररोज अनेक भागात स्थानिक गल्लीतील भाई, दादा, तात्या तसेच डॉन असे फ्लेक्स लावले जात आहे यावर नगरपरिषद कारवाई केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरातील अनेक होर्डिंग्ज परवानगी आहे का? अतिक्रमण विभागाकडून कारवाई का होत नाही? असे प्रश्नही समोर आले आहे. या सर्व प्रकरणांमुळे स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध बारामतीच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इंदूरच्या धर्तीवर बारामती शहर करायचे होते. मग आज पुन्हा विदरूपीकरण सुरू करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासन दादांच्या स्वप्नाला मूठमाती देत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button