इ. १०वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न !
१४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण

इ. १०वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न !
१४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचा सलग १७ व्या वर्षी एस.एस.सी बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला. चि. श्रीनिवास परेश वाघमोडे याने ९८.२०% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक, कु. रुजवी विजय केसकर हिने ९७.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. श्रेया संदिप पवार हिने ९६.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवला. १०० % निकाल नोंदवत सर्व विदयार्थी अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून विशेष म्हणजे १४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तसेच सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला व पंचकोश विकसनाकडेही लक्ष दिले.
अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी विद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवर गुरुकुल समन्वयक व मार्गदर्शक मा.श्री. श्रीकृष्णदादा अभ्यंकर (निगडी) हे उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मनोगतात विद्यालयाच्या गुणवत्तेच्या चढत्या आलेखाचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), संचालक मा.श्री. धनंजय क्षीरसागर, मा. श्री. प्रवीण अनघळ सर, मुख्याध्यापक यांचे हस्ते विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे आचार्य , मुख्याध्यापक, बालभवन प्रमुख व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.