आपला जिल्हा

युगेंद्र पवार यांच्या पाठपुराव्याला यश;सिंचन प्रश्नांवर पुढाकार. बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय…

नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पासंदर्भातही त्यांनी ठोस भूमिका मांडत शासनाकडून निधीची मागणी केली.

युगेंद्र पवार यांच्या पाठपुराव्याला यश;सिंचन प्रश्नांवर पुढाकार. बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय…

नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पासंदर्भातही त्यांनी ठोस भूमिका मांडत शासनाकडून निधीची मागणी केली.

बारामती वार्तापत्र 

युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी पुणे येथील सिंचन भवनात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना गती मिळाली आहे.यामध्ये चार महत्त्वाचे मुद्दे पुढे आले पहिले म्हणजे, शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पंप येत्या दोन दिवसांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरे म्हणजे, जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी २२ एप्रिलनंतर सोडण्याची ग्वाही मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांनी दिली.

तिसरे म्हणजे, बंदिस्त पाईपलाईन आणि पुरंदरसह इतर सिंचन योजनांबाबत सकारात्मक भूमिका घेत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. आणि चौथा म्हणजे,नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्प व पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत सद्यस्थिती स्पष्ट करत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

युगेंद्र पवार यांच्या पाठपुराव्यामुळे या निर्णयांना वेग मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पासंदर्भातही त्यांनी ठोस भूमिका मांडत शासनाकडून निधीची मागणी केली. या प्रकल्पामुळे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भाग ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एकूणच, युगेंद्र पवार यांच्या सक्रिय पुढाकारामुळे आणि डॉ. हनुमंत धुमाळ यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सिंचनाच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलली जात असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Back to top button