केरळ येथे झालेल्या नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत सौ आरती वैभव एकाड पाटील यांनी घवघवीत यश
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शारीरिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत

केरळ येथे झालेल्या नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत सौ आरती वैभव एकाड पाटील यांनी घवघवीत यश
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शारीरिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
बारामती वार्तापत्र
केरळ येथे झालेल्या नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत सौ आरती वैभव एकाड पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले आहे
बारामती मधील सौ आरती वैभव एकाड पाटील यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून नुकत्याच दिनांक १८ मे ते २२ मे २०२२ दरम्यान झालेल्या चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया या स्पर्धेत ४०+ (चाळीस) वयोगटातील मास्टर महिला ७६ वजनीगटात पॉवरलिफ्टिंग (वजन उचलणे) द्वितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केले आहे ४०+ (चाळीस) वयोगटातील मास्टर महिला ५ K.M. (किलोमीटर) चालण्याच्या स्पध्रेत द्वितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केले आहे संपूर्ण बारामती शहरांमधून त्यांचे अभिनंदन व कौतूक होत आहे.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (CBSE) त्या शारीरिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत स्कूलचे संचालक श्री मिलिंद शहा (वाघोलीकर) सर आणि धवल शहा सर तसेच प्रिन्सिपल राखी माथूर व स्मिता ढवळीकर मॅडम आणि शाळेचा संपूर्ण स्टाफ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले आहे.