माळेगाव बु
कैलास बोराडे मारहाण प्रकरण, बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे गाव बंद करून निषेध व्यक्त तसेच आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई ची मागणी
मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी

कैलास बोराडे मारहाण प्रकरण, बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे गाव बंद करून निषेध व्यक्त तसेच आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई ची मागणी…
मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी
बारामती वार्तापत्र
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथे कैलास बोराडे यांना झालेल्या अमानुष मारहाण व गरम सळईने चटके दिल्याच्या प्रकरणी माळेगाव बुद्रुक, ता. बारामती येथील संतप्त झालेल्या ओबीसी समाजाच्या वतीने माळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांना निवेदन देऊन सदरील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांचेवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच यावेळी बोराडे यांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सागर मोटे, संदीप आढाव, अक्षय(बाबू) वाघमोडे, ज्ञानेश तांबे, केशव भोसले, महेश लकडे, मयूर गव्हाणे, ऋषी गोफणे, पिनू खरात, सागर बनसोडे, कुणाल सकट, निहाल भोसले, अमोल जगताप, राहुल भोसले इत्यादी उपस्थित होते…