स्थानिक

जगन्नाथ वणवे यांना ग्राममर्मी आदर्श सरपंच पुरस्कार

शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांमध्ये कमी वेळेत पोहचवल्याबद्दल सदर पुरस्कार

जगन्नाथ वणवे यांना ग्राममर्मी आदर्श सरपंच पुरस्कार

शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांमध्ये कमी वेळेत पोहचवल्याबद्दल सदर पुरस्कार

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील सरपंच जगन्नाथ वनवे यांना बारामती तालुका ग्राममर्मी आदर्श सरपंच पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.

जळगाव येथील ग्रामगौरव मीडिया फौंडेशन,पुणे जिल्हा परिषद यांच्या सयूंक्त विद्यमानाने गुरुवार दि.०३ एप्रिल रोजी पुणे येथे झालेल्या ग्रामसंवाद व ग्राममर्मी सन्मान सोहळा प्रसंगी आमदार राहुल कुल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील, कोकण विद्यापीठ चे मा कुलकुरु डॉ एस एस मगर, मा.आयुक्त चंद्रकांत दळवी ,ग्राम गौरव चे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे व भाग्यश्री ठाकरे धनश्री ठाकरे आणि वंजारवाडी चे उपसरपंच गोरख चौधर,ग्रामविकास अधिकारी निलेश लवटे , नवनाथ चौधर,बाबासाहेब ठोकळे,
पोपट जगताप ,नितीन चौधर,सागर दराडे ,शरद चौधर,अनिल कायगुडे,भारत मोकाशी,गोरख चौधर,प्रवीण चौधर,सोमनाथ गायकवाड,हरीश कुंभारकर आदी उपस्तीत होते.

वंजारवाडी गावामध्ये रस्ता, वीज पाणी ,शिक्षण ,आरोग्य मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांमध्ये कमी वेळेत पोहचवल्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात आला.

ग्रामस्थांच्या सहकार्याने वंजारवाडी ग्रामपंचायत विविध विकास कामांमध्ये नेहमी अग्रेसर ठेवू पुरस्कार स्वीकारल्यानंतर सरपंच जगन्नाथ वनवे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!