इंदापूर
जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे (पुर्व) जिल्हा कार्याध्यक्षापदी राधिका निवास शेळके यांची नियुक्ती
सामाजिक क्षेत्रातील काम पाहून मिळाली बढती
जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे (पुर्व) जिल्हा कार्याध्यक्षापदी राधिका निवास शेळके यांची नियुक्ती
सामाजिक क्षेत्रातील काम पाहून मिळाली बढती
इंदापूर : प्रतिनिधी
जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे (पुर्व) जिल्हा कार्याध्यक्षा या पदावर राधिका निवास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे (पुर्व) जिल्हाध्यक्षा प्रा. जयश्री गटकुळ यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. राधिका शेळके या इंदापूरच्या रहिवासी आहेत. या आधी त्या जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष या पदावर कार्यरत होत्या. प्रामाणिक व तडफदारपणे कार्य करण्याची त्यांची पद्धत पाहून मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड कार्यकारिणीने शेळके यांना बढती देण्याचा निर्णय घेतला आहे.